vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका…

मुंबईप्रतिनिधी

आज ऐन दिवाळीच्या दिवशी मरोळ बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मांडत आक्रमक झाले आहेत.

गेले तीन दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST Employee Strike) संप पुकारला आहे. दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने मुंबईकरांना वाहतुकीचा चांगलाचं फटका बसला आहे. तरी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून (BEST Contract Employees) हा संप पुकारण्यात आला आहे. 22 ऑक्टोबर पासून या संपास सुरुवात झाली असुन विविध आगारातील कर्मचारी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सांताक्रुज (Santa Cruz) आगारातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारला होता तर काल जोगेश्वरी (Jogeshwari) आगारातली कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं. आज तर ऐन दिवाळीच्या दिवशी मरोळ (Marol) बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मांडत

 

गेले वर्षी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) एसटी महामंडळा विरुध्द संप पुकारला होता. पगारवाढीसह विविध मुद्द्यावरुन त्यांनी महामंडळा विरोधी आक्रमक झाले होते. पण यावर्षी मुंबईकरांची (Mumbai) जीवनवाहिनी बेस्टच्या (BEST Bus) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे. तरी हा संप बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून  पुकारण्यात आला आहे

पगारवाढीसह दिवाळीचा बोनस (Diwali Bonus) अशा विविध मागण्यासह कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तरी मुंबईतील विविध बेस्ट बस डेपो पैकी फक्त सांताक्रुजमधील शेकडो कंत्राटी कर्मचारी  संपावर गेल्याने पश्चिम मुंबई  भागातील नागरिकांना वाहतूकीचा फटका बसत आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

सोशल मीडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कझाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा 30 वा वर्धापनदिन व अण्वस्त्र चाचणी विरोधी दिवस साजरा,जगाला अण्वस्त्र मुक्त करणे काळाची गरज – महेंद्र सांघी

82व्या वर्षी विक्रम गोखलेंनी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश…..*हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !* – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले