vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गोल्ड  मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा

 गोल्ड  मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा

मुंबई प्रतिनिधी  या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कोविड 19 प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथिलता आणि अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून येत आहे. देशात जुलै-सप्टेंबर 2021 तिमाहीदरम्यान, सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी नोंदवण्यात आली आहे. या तीन महिन्यात सोन्याची आयात 740 टनांची झाली आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने फायनांशिअल सर्विसेजचे म्हणणे आहे की, सध्याच्या स्थितीत सोन्यात गुंतवणूकीची संधी आहे. पुढील एका वर्षात सोन्याच्या किंमतींमध्ये 52 हजार – 53 हजार रुपये प्रति तोळे पोहचण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरांवरून खरेदी केल्यास 5000 रुपये प्रति तोळे इतका फायदा होऊ शकतात.

सोन्याचे भाव 25 टक्कांनी वाढले

रिपोर्टच्या मते, 2019 आणि 2020 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. 2019 मध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये 52 टक्क्यांनी आणि 2020 मध्ये साधारण 25 टक्क्यांची तेजी आली आहे. परंतु 2021 मध्ये काही प्रमाणात सोन्याच्या किंमतींमध्ये काहीशी घसरण नोंदवण्यात आली.

2020 मध्ये दिवाळीमध्ये कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. या दिवाळीत त्यातुलनेत निर्बंध कमी आहेत. दुकाने पूर्ण क्षमतेने उघडली आहेत. त्यामुळे सोन्याच्या आयातीतही वाढ झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिंलच्या आकडेवारीनुसार, सोन्याची आयात सप्टेंबरपर्यंत 740 टन होती. सोन्यात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.

संबंधित पोस्ट

हे’ 20 शेअर आज तुम्हाला करणार मालामाल! लगेच खरेदी करा…

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता..अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी हे शुभ मानले जाते

ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती..

महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड..

vishwatmaklokswamivarta

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे  

बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta