vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर येथील *’वसुंधरा प्रतिष्ठान’ ने साजरी केली “माणुसकीची दिवाळी”*अनाथ मुलींना नवे ड्रेस, मिठाई वाटून आनंदोत्सव*

लातूर येथील *’वसुंधरा प्रतिष्ठान’ ने साजरी केली “माणुसकीची दिवाळी”*अनाथ मुलींना नवे ड्रेस, मिठाई वाटून आनंदोत्सव*

 

लातूर : येथील *वसुंधरा प्रतिष्ठान* च्या वतीने गत सात वर्षांपासून अनाथ लेकरांसोबत दिवाळी साजरी केली जाते. यावर्षीही हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवून ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी झाली. एमआयडीसी येथील स्वयंसिद्धा महिला मंडळ येथील अनाथ मुलींना नवे ड्रेस आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

*वसुंधरा प्रतिष्ठान* या सामाजिक संस्थेच्या वतीने गत सात वर्षांपासून ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील अनाथालयातील लेकरांना, मुला-मुलींना नवीन कपडे आणि मिठाई भेट दिली जाते. यंदाही हा उपक्रम हाती घेऊन अनेकांच्या सहकार्यातून अनाथ आश्रम येथील मुलींना नवीन ड्रेस आणि मिठाई वाटप करण्यात आली. एमआयडीसी येथील स्वयंसिद्धा महिला मंडळ अंतर्गत चालणाऱ्या अनाथ आश्रमातील २५ मुली आणि ०३ मुलांना नवीन कपडे आणि मिठाई भेट देऊन त्यांच्यासमवेत हा सण साजरा झाला. यावेळी मुलींनी सुंदर रांगोळी काढली होती. पणत्यांची आरास करून दीपोत्सव साजरा झाला. ज्यांचं कोणी नाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी हा उपक्रम राबविल्याचे प्रा.योगेश शर्मा यांनी सांगितले.

 

या उपक्रमासाठी मुकुंद डहाळे, जितेंद्र मालवी, सुजित चव्हाण, अक्षय घोंगडे, अमोल पोतदार, रोहित शिंदे, अमर सूर्यवंशी, सतीश घोटेकर, अतिख शेख, गौस मणियार, सुरेश करपे, गजानन साबदे, श्रीधर गायकवाड, अजय कुटे, सचिन जाधव, आशिष पांचाळ, कल्पना शिंदे, सारिका सलगर, ज्योती कांबळे, कानडे मॅडम आदींनी सहकार्य केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, उमाकांत मुंडलीक, ऍड.अजित चिखलीकर, अमोल स्वामी, राहुल माशाळकर, दत्ता जाधव, कृष्णा काळे, सतीश गोटेकर, रोहित शिंदे, अपर्णा बागले, मानसी कुलकर्णी, अलका मुळे, सुलोचना काटगावकर आदींनी परिश्रम घेतले.

 

*आत्मिक समाधानासाठी उपक्रम : राहुल माशाळकर*

***********************

वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे गत ७ वर्षांपासून अनाथ लेकरांना दिवाळी निमित्त नवीन कपडे आणि मिठाई वाटून दीपोत्सव साजरा केला जातो. याला माणुसकीची दिवाळी असे नाव देण्यात आले आहे. माणुसकी कायम जिवंत राहावी आणि अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वसुंधरा प्रतिष्ठानचे राहुल माशाळकर यांनी दिली.

संबंधित पोस्ट

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसासांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’मधील १२ गडकिल्ल्यांच्या समावेशाची शिफारस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा महिला व बाल विकास विभागाने रोखले 131 बालविवाह बालविवाहाच्या 2 प्रकरणात गुन्हे दाखल…

कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना;16 ऑक्टोंबरपर्यंत योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविले