
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेल्या तेलतुंबडेचा गडचिरोलीत सी६० पथकासोबत चकमकीत मृत्यू झाला….
महाराष्ट्र प्रतिनिधी
गडचिरोलीमध्ये शनिवारी सकाळी पोलीस आणि नलक्षलींमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली असून, या घटनेत भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद तेलतुंबडेचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
गडचिरोलीच्या ग्याराबत्तीमध्ये झालेल्या हिंसाचारात आज २६ नक्षली मारले गेले. यामध्ये भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलींद तेलतुंबडे याचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मिलींद तेलतुंबडे याच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. सीपीआय (माओवादी) चे केंद्रीय समिती सदस्य, तेलतुंबडे हा एल्गार परिषद-कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील वॉन्टेड आरोपी होते आणि त्यांच्यावर 50 लाख रुपयांचे बक्षीस होते.
इंजिनिअरिंग झालेला मिलिंद तेलतुंबडे हा गेल्या ३० वर्षांपासून नक्षली चळवळीत होता. यवतमाळ जिल्ह्यातील मूळच्या वणी तालुक्यात असलेल्या राजूर इथंला तो रहिवासी होता. मिलिंद तेलतुंबडे अनेक टोपणनावांनी ओळखला जात होता. सह्याद्री, ज्योतिराव, श्रीनिवास, दिपक, एम अशी अनेक नावे त्याला होता. माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिव म्हणूनही त्याने काम केलं होतं.महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ झोन स्थापन करण्यात मिलिंद तेलतुंबडेची महत्त्वाची भूमिका होती. या झोनचा तो सर्वात मोठा नेता होता. काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सुरजागड खाणी विरोधात आंदोलनाबाबत टीका करणारे पत्र व्हायरल झाले होते. त्यात नक्षल्यांचा प्रवक्ता म्हणून श्रीनिवासची सही होती, पण ते पत्र सह्याद्री म्हणजेच मिलिंद तेलतुंबडेने लिहिल्याचं समोर आलं होतं.
मिलींद तेलतुंबडेला सगळ्यात मोठा नक्षली कमांडर असल्याचं मानलं जात होतं. त्याला ठार करणं हे महाराष्ट्र पोलिसांचं मोठं यश मानलं जातं आहे. त्यामुळे आता नक्षली चळवळीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने हे पोलिसांचा मोठं पाऊल मानलं जातं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह किमान २६ नक्षलवाद्यांना शनिवारी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. या कारवाईत चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौम्या मुंडे यांच्या नेतृत्वाखाली C-60 पोलीस कमांडो पथक शोध मोहीम राबवत असताना मार्डिनटोला वनपरिक्षेत्रातील कोरची येथे गोळीबार झाला.



