vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सायन पनवेल महामार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीनिंग मोहीम

सायन पनवेल महामार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीनिंग मोहीम

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  स्वच्छ नवी मुंबई शहर सर्व दृष्टीने स्वच्छ असावे याकरिता दररोजच्या नियमित स्वच्छतेप्रमाणेच शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने दुर्लक्षित व पडीक जागांची तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पदपथांच्या कडेला घट्ट झालेली माती तसेच झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या आणि पालापाचोळा यांची बारकाईने स्वच्छता करण्यात आली.

 नेरूळ येथील एलपी जंक्शनपासून नेरूळ रेल्वे स्टेशन आणि नेरूळ रेल्वे स्टेशन ते हावरे जंक्शन तसेच हावरे जंक्शन ते अपोलो जंक्शन अशा सर्व बाजूंच्या मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे सायन पनवेल हायवेवरही साफसफाई करण्यात आली.

 विशेष म्हणजे पालापाचोळा व कचरा उचलून झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक फाॅगर्स मशीनद्वारे स्वच्छ केलेले पदपथ, रस्ते आणि दुर्लक्षित जागा पाणी मारून स्वच्छ करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून शुद्ध केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे फॉगर्स वाहनाद्वारे रस्ते सफाई केल्याने हवेतील धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदूषणही कमी होणार आहे. अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम तुर्भे विभाग कार्यालय परिसरातही राबविण्यात आली. नियमित स्वच्छतेप्रमाणेच अशा प्रकारच्या डीप क्लिनिंग मोहिमा राबवून नवी मुंबई परिसरातील सर्वांगीण स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.0000

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा…

भारत पाकिस्तान युद्ध तणाव: ‘पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न- कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

मतदारांनो,मतदानाचा हक्क बजावा!,नागपूर जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगट, भाजपा विरूद्धचा आदित्य ठाकरे एल्गार अजून तीव्र होणार? 7व्या सत्रातील शिवसंवाद दौरा उद्या बदनापूर ते संभाजीनगर

vishwatmaklokswamivarta

अमृत महा आवास अभियान २०२२-२३ मधील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर