vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲपची मंगळवारी विशेष कार्यशाळा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲपची मंगळवारी विशेष कार्यशाळा

अमरावती, प्रतिनिधी) : लेखा व कोषागारे संचालनालयाने निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महा-उपलब्धी या मोबाईल ॲपबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही कार्यशाळा मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे‘महा-उपलब्धी’ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनासंबंधी विविध सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव (ले. व को.) ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी (निवे.) अमोल इखे यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानवडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण 

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील• प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश• लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार पीक कर्ज शिबीरांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा निर्मूलन भूषण पुरस्काराने संदीप गोवळकर सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!