vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  अखेर मुंबईत दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  अखेर मुंबईत दाखल…

मुंबई प्रतिनिधी :  काही महिन्यांपासून गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशानुसार, तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. मला जे काही म्हणायचय ते कोर्टात म्हणेन” असे परमबीर सिंह यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये होते. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत, त्याच्या तपासामध्ये ते सहकार्य करतील. स्वत: परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली.

मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात माहिती दिली होती. ४८ तासात सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहेत असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.

संबंधित पोस्ट

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

नवी मुंबईत अग्नीतांडव ! पावणे MIDC तल्या रासायनिक कारखान्याला भीषण आग

महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना: लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर लाटप्पा 2 अंतर्गत 14 हजार 951 घरकुलांना मंजुरी मंजुर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित होणार 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा निर्णय : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल शासकीय महापूजा सुरु असताना खुले राहणार मुखदर्शन…

आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई चा गौप्यस्फोट

vishwatmaklokswamivarta