vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना: लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी…

महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, एकाचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी…

 

 

राज्य प्रतिनिधी

फुग्यामध्ये वायू भरणाऱ्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यामुळे फुगे विक्री करणाऱ्याचा मृत्यू झाला असून १२ लहान मुलं गंभीर जखमी झालेले आहेत. ही घटना लातूरमध्ये घडली. – लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर १२ मुलं जखमी झाली आहेत. लातूर शहरातील तावरचा कॉलनीतील इस्लामपुरा भागात ही घटना घडली. जखमींपैकी एक मुलगी ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

रामा इंगळे (वय ५०) असे मृत फुगेवाल्याचे नाव आहे. तेबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील वाघाळा राडी येथील रहिवासी होते. रविवारी सायंकाळी साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फुगे विकणारा एक जण जागीच ठार झाला तर १२ बालके गंभीर जखमी झाले आहेत. जखमी बालकांना लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार लातूरमधील तावरचा कॉलनीमधील इस्लामपुरामध्ये फुग्यामध्ये गॅस भरताना. यासाठी वापरल्या जाणाऱ्यासिलेंडरचा स्फोट झाला आहे. त्यातील ९ जखमी लहान मुलं रुग्णालयात आलेली आहेत. त्या नऊ लहान मुलांचं वय ३ ते १२ च्या दरम्यान आहे. त्यापैकी एका पाच वर्षाच्या मुलीला ७० टक्के भाजलं आहे. बाकी मुलांपैकी एका मुलाचा हात मोडला आहे. बाकी सर्व मुलं धोक्याबाहेर आहेत.

फुग्यात गॅस भरण्याच्या सिलेंडरचा नेमका कशामुळं स्फोट झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेमुळं एका व्यक्तीला प्राणाला मुकावं लागलं तर १२ चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

जखमी शेर मैदान मे-10 लोकसभा, 15 विधानसभा मतदार संघ लढविणारे बाबासाहेब पाटील शिंदे

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवाद- समन्वय आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबईतील जे जे हॉस्पिटल चे प्रमुख डीन,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त.

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक