vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत महालक्ष्मी: बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक  बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

मुंबईत महालक्ष्मी येथील शक्ती मिल बलात्कार… मुंबईः बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक  बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

तिघांची फाशी टळली, जन्मठेपेची शिक्षा

शक्तीमिल बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. या तिघांनाही आज हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

संबंधित पोस्ट

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनानिमित्तमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत होणार 39 पुस्तकांचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार;”भारताची राज्यघटना” विषयावर संबोधन..

vishwatmaklokswamivarta

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग,  शेतमजूर,, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू,अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक*दिवसातून दोनवेळा करणार आरोग्य तपासणी…

सेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta