vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर लाटप्पा 2 अंतर्गत 14 हजार 951 घरकुलांना मंजुरी मंजुर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित होणार 

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा -1 अंतर्गत पुर्ण घरकुलांचे ई-गृहप्रवेश १७ सप्टेंबर लाटप्पा 2 अंतर्गत 14 हजार 951 घरकुलांना मंजुरी मंजुर लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित होणार

 

 

 

गडचिरोली प्रतिनिधी : सन 2023-24 व 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे चावी वितरण व ई-गृहप्रवेशाचा प्रतिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमाचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी सन 2024-25 या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरिता 14 हजार 951 एवढे उदिदष्ट दिले आहे. याअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

देशातील 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता ऑनलाइन वितरित करण्यांत येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन सभागृह येथे करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

मुंबईत ओला आणि उबर आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार..

vishwatmaklokswamivarta

माळशेज घाट दरीत उडी मारून एसटी वाहकची आत्महत्या, कारण अस्पष्ट*

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रॅन्झिट कँप रहिवाशांचे त्याच ठिकाणी तात्पुरत्या पुनर्वसनाचे निर्देश,घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन विकसकाचा पर्याय शोधा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण..