vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

लातूर, प्रतिनिधी: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नवयुवक आणि नवयुवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे. नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे 19 जानेवारी, 2026 ते 3 एप्रिल, 2026 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थींनी 18 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रावर हजर रहावे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 13 जानेवारी, 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण पुणे यांच्या संकेतस्थळावरून (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून) सीडीएस-66 कोर्सचे प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट भरून सोबत आणावी. प्रवेशासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याने लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा. यासोबतच संबंधित पात्रता प्रमाणपत्रही आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांच्याशी ईमेल (training.pctcnashik@gmail.com), दूरध्वनी (0253-2451032) किंवा व्हॉट्सअॅप (9156073306) द्वारे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा पाया भरणीचा कार्यक्रम संपन्न. 

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

पंतप्रधानांनी डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याची झलक केली सामायिक

vishwatmaklokswamivarta

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन