vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी आपले अर्ज १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

राज्य व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीचा गौरव व्हावा, या उद्देशाने राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, तर जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. जिल्हास्तरावर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच गुणवंत क्रीडापटूंना पुरस्कार देण्यात येणार असून, क्रीडापटूंच्या पुरस्कारामध्ये पुरुष, महिला आणि दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १० हजार रुपये रोख असे आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षांचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शकाने महाराष्ट्रात सलग १० वर्षे क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे आणि त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण असावे. तसेच, मागील १० वर्षांत वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते खेळाडू, तसेच कनिष्ठ, शालेय, ग्रामीण आणि महिला (खेलो इंडिया) गटांतील राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले खेळाडू घडविणाऱ्या मार्गदर्शकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल.

खेळाडूंच्या पुरस्कारासाठी पुरस्काराच्या वर्षासह लगतपूर्व पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. संबंधित खेळाडूने मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ, कनिष्ठ, शालेय, राष्ट्रीय शालेय तसेच केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

या पुरस्कारासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुका क्रीडा संकुल, नेहुली-संगम, ता. अलिबाग, जि. रायगड येथून प्राप्त करून घ्यावेत. पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी ८०९७०२८३९८, ९९६०७०२५१० किंवा ७७६९९१४१५२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होणार नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड ॲक्शन मोडवर; जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीसोबतच विविध यंत्रणांचा आढावा *मृद व जलसंधारणाच्या कामांना गती देवून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड*▪️ जिल्हास्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याच्या सूचना▪️जिल्हास्तरीय यंत्रणांकडून कामांचा आढावा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

vishwatmaklokswamivarta