vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

सातारा, प्रतिनिधी: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सावली (ता. जि. सातारा) येथे आज लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा तसेच ग्रामपंचायत सावली आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हे काम करण्यात आले

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पुनर्भरणासाठी व्हावा, तसेच परिसरातील जलसंधारणाला चालना मिळावी, या उद्देशाने वनराई बंधाऱ्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. या कामांतर्गत सर्वप्रथम बंधारा उभारण्यासाठी निश्चित केलेल्या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यानंतर सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळू व स्थानिक उपलब्ध साहित्य भरून वनराई बंधाऱ्याची मजबूत बांधणी करण्यात आली. यासोबतच जुन्या व पडझड झालेल्या वनराई बंधाऱ्याची स्वच्छता करून त्यातील गाळ काढण्यात आला. बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी माती, दगड आणि प्लॅस्टिक कागदाचा वापर करण्यात आला.

या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. बंधाऱ्याच्या उभारणीसाठी गोण्या, वाळू, दगड यांसारख्या स्थानिक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास कमी खर्चात पाणी अडविणे व जिरविणे शक्य होते. तसेच गावपातळीवर जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण होते. सावली येथील लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचा उपक्रम हा जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

भूजल संवर्धनासाठी शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास जलसंधारणाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळू शकते. त्यामुळे गावातील नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला चालना द्यावी, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

000

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत*१.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

नि:पक्ष, भयमुक्त निवडणुकीसाठी आवश्यक उपाययोजना करा- निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी

शांतता समितीची बैठक;*बकरी ईद शांततेत व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरी करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन*

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी