vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बांधिलकी:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

बांधिलकी:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आज हा मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.

मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या प्रसंगी श्री. बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.

या प्रसंगी इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आ.सुहास शिरसाट, आ.अनुराधाताई चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खा.डॉ.भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.

००००

 

संबंधित पोस्ट

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू 🗳️

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’चा उत्साहात शुभारंभ;शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली – आमदार संजय गायकवाड

उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पाणी आरक्षणास मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने