vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासह आरोग्य निर्देशांकात सुधारणा करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

हिंगोली, प्रतिनिधी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्याच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा आणि दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. तसेच प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृह, आयुष्मान भारत योजना, ईसीजी सुविधा आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कक्षांची पाहणी केली. यावेळी महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हृदयविकारग्रस्त चिमुकल्यांना आरोग्यमंत्र्यांचा मायेचा आधार!आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साधला शस्त्रक्रियेनंतरच्या बालकाशी संवाद

हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना नवजीवन देणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या कार्याचा गौरव करत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान महिला रुग्णालय, वसमत येथे हृदयरोगावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झालेल्या बाल लाभार्थ्यांशी आस्थेने संवाद साधला. यावेळी त्यांनी बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गरजू बालकांचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार व हृदयशस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या योजनेमुळे अनेक बालकांना निरोगी आयुष्याची नवी संधी मिळत आहे.या प्रसंगी आरोग्य विभागाचे आयुक्त श्री. काटकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस , डॉक्टर संदीप काळे तालुका आरोग्य अधिकारी वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी RBSK पथकाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अनुदानाची माहिती‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ ॲपद्वारे तपासावी

vishwatmaklokswamivarta

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…