vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रभाग क्र. १ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा- नगरसेवक भास्कर आबा दानवे

दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रभाग क्र. १ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा- नगरसेवक भास्कर आबा दानवे

जालना प्रतिनिधी : जालना शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाई आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर आबा दानवे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना उपाययोजना करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्रामध्ये प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, जलवाहिनी दुरुस्तीतील विलंब दूर करणे आणि नवीन जलवाहिन्या टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रभाग क्रमांक १ मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिम बाजूस नव्याने विकसित झालेल्या द्वारका नगर, रॉयल नगर आणि भगत नगर या परिसरांमध्ये महानगरपालिकेमार्फत जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या परिसरात पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पत्रात केली आहे

याशिवाय, प्रभाग क्रमांक १ मधील विविध परिसरांमध्ये पाणीपुरवठा अनियमित व अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने नागरिकांना सतत पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो. संबंधित भागात जलवाहिनी नादुरुस्त होणे किंवा लिकेज झाल्यास दुरुस्तीसाठी रस्त्यांवर खोदकाम केले जाते, परंतु प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते. तसेच, रस्त्यांवर खोदकाम करून खड्डे व उघड्या अवस्थेतील कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रभागातील काही नव्याने विकसित झालेल्या सोसायट्यांमध्ये अद्याप जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यातच चालू वर्षातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळे फाईन लिव्हिंग सोसायटी, स्काय बर्ड सोसायटी (जिजामाता कॉलनी), म्हाडा कॉलनी (शिवाजीनगर), ढवळेश्वर आणि मानकरतन नगर या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्राधान्य देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केली आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

बालसाहित्याकडे द्या विशेष लक्ष;जिल्हाधिकाऱ्यांची साहित्यिकांना सादभरपूर वाचनानंतरच लेखनाकडे वळावे: संमेलनाध्यक्ष डॉ. विशाल तायडे

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर ! 🔥 १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय, तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी धरणे व निदर्शने आंदोलन

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर 

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार