
देशभरातील बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात बँक संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
नवी दिल्ली प्रतिनिधी: तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार तुम्हालाही पुढच्या आठवड्यात काही बँकिंग काम असेल, तर सुरुवातीच्या दिवसातच ते निपटून घ्या. कारण पुढील आठवड्यात चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
यामध्ये बँक संपामुळे दोन दिवस बंद राहणार आहे.
बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात बँक संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या दोन दिवसीय संपामुळे पुढील आठवड्यात 16 डिसेंबर (गुरुवार) आणि 17 डिसेंबरला (शुक्रवार) बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. याशिवाय, 19 डिसेंबरला रविवारच्या सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. अशा प्रकारे पुढील आठवड्यात देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत.
बँकांच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्ट्याही दिल्या जातात. पुढील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 डिसेंबरला यू सोसो थामचा वर्धापन दिन आहे. त्यामुळे मेघालयातील बँकांचे कामकाज शनिवारी बंद राहणार आहे. पुढील आठवड्यात देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत, मात्र स्थानिक सुट्ट्यांमुळे मेघालयातील बँका चार दिवस बंद राहणार आहेत.
येत्या आठवड्यात महिन्याचा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे मेघालय वगळता देशाच्या इतर सर्व भागात शनिवारी बँका सुरू राहणार आहेत. याशिवाय आठवड्याचे पहिले तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी बँका सामान्य कामकाज करतील. अशा परिस्थितीत आठवड्याच्या सुरुवातीला बँकिंगशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे पटकन उरकून घ्या. अन्यथा नाहक त्रास होऊ शकतो.
या सेवांवर परिणाम होणार नाहीऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. सर्व बँकांच्या डिजिटल बँकिंग सेवा इंटरनेट बँकिंग यूपीआय आधारित सेवा मोबाईल बँकिंग इत्यादी सामान्य पद्धतीने कार्य करतील. तसेच, संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आठवडाभरात एटीएममधून पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकांनी बंदोबस्त सुरू केला आहे. यासाठी एटीएममध्ये रोखीची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना



