
पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक; बिटकॉईनबाबतचं ‘ते’ ट्विट होतंय जोरदार व्हायरल….
दिल्ली – नवी दिल्ली प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हे काही वेळासाठी हॅक केल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली होती. मात्र ज्यावेळेत अकाऊंट हॅक झालं तेव्हा करण्यात आलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्या ट्विटचा स्क्रिनशॉट आता तुफान व्हायरल होत आहे. मोदींच्या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्विट केलं असून भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे असं म्हटलं होतं मात्र त्यानंतर लगेचच अकाऊंट रिस्टोअर केल्याची माहिती पीएमओकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने “नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल काही काळासाठी हॅक झालं. त्यानंतर हा मुद्दा ट्विटरकडे उपस्थित करण्यात आला आहे आणि अकाऊंटदेखील त्वरित रिस्टोअर आणि सुरक्षित करण्यात आले आहे. हॅक झाल्यानंतर काही मिनिटांत शेअर केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा” असं म्हटलं आहे. रविवारी साधारण 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. आता अकाऊंटवरून हे ट्विट हटवण्यात आले आहे.



