vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण,महाराष्ट्रात भाजपचा  ‘दिव्य काशी, भव्य काशी सर्व नेते मंडळी सहभागी होणार…..

महाराष्ट्रात भाजपचा  ‘दिव्य काशी, भव्य काशी सर्व नेते मंडळी सहभागी होणार…..

 

मुंबई प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात ‘दिव्य काशी, भव्य काशी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ. अतुल सावे आदी सहभागी होणार आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, आ.आशीष शेलार , प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे, माजी मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे हे शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

 

तुषार भोसले 50 साधूंसह वाराणासीत

 

परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अनुक्रमे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार अतुल सावे, ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे हे भाग घेणार आहेत. वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले हे राज्यातील 50 साधू संतांसह सहभागी होणार आहेत.

 

अथर्वशीर्ष पठण व रुद्राभिषेक

 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते काशी विश्वनाथ धामचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने नगरसेवक अतुल शाह यांनी सकाळी 11 वा., माधव बाग मंदिर येथे प्रथम स्वच्छता अभियान आयोजित केले आहे. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण व रुद्राभिषेक आणि त्यानंतर काशी विश्वनाथ धाम येथून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माधवबाग मंदिर येथे दुपारी 12 वाजल्यापासून दाखविण्यात येणार आहे.

 

संबंधित पोस्ट

संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त Whatsapp Status, HD Images शेअर करून शंभूराजांना करा अभिवादन!

जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ…

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक- केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक,केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला ‘झिरोधा’चा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta