vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सचिन वाजे ने पुन्हा न्यायालयात धाव घेतली ,चिकन, अंडी आणि…, वाझेच्या तुरुंगातील मागण्या …?

सचिन वाजे ने पुन्हा न्यायालयात धाव घेतली ,चिकन, अंडी आणि…, वाझेच्या तुरुंगातील मागण्या …?

 

सचिन वाझेने पुन्हा न्यायालयात धाव घेत आजारपणाचं कारण पुढे केलं आहे. घरच्या जेवणाची आणि फिजिओथेरपीची परवानगी त्याने मागितल्याचं समोर येतंय.वाझेवर (Sachin Waze) ऑक्टोबरमध्ये ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. त्यामुळे वाझेचं वजन 5 किलोने कमी झालंय. उपचारानंतर डॉक्टरांनी वाझेला नियमित फिजिओथेरपी आणि उच्च प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र जेलमधील कैद्यांना त्याची परवानगी नाही. तसेच यासाठी कोर्टाची विशेष परवानगीही घेणं गरजेचं आहे.

वाझेला मागील सुनावणीस घरच्या जेवणाला परवानगी जरी दिली असली, तरी कारागृहात त्याला घरातून पाठवलेली अंडी आणि मांसाहार खाण्यास मनाई आहे. त्यामुळे वाझेने कोर्टाकडे नव्याने काही मागण्या केल्या आहेत.सध्या कारागृहात दाढी करण्यासाठी एकच वस्तरा वापरला जात असल्याचे सांगत यापासून क्षयरोग होण्याची भीती आहे, असं वाझेने सांगितलं. त्यामुळे खासगी ट्रिमर वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी वाझेने संबंधित याचिकेत केली आहे.8 डिसेंबर रोजी चांदिवाल आयोगात (Chandiwal Commission) चौकशीसाठी नेले जात असताना वाझेला छातीत तीव्र वेदना झाल्या. त्याला चक्कर येत होती. परंतु त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी पुन्हा तुरुंगात आणण्यात आलं. यानंतर याचिकेत खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी वाझेने केली आहे. ज्या रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिथे उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सरकारचा निर्णय : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल शासकीय महापूजा सुरु असताना खुले राहणार मुखदर्शन…

नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आवाहन

सुराज्य अभियाना’ला यश : बेकायदेशीर प्रवासी ॲप बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना !कोट्यवधी प्रवाशांची लुट करणार्‍या प्रवासी ॲपवर आर्थिक दंडासह फौजदारी गुन्हे दाखल करा ! – ‘सुराज्य अभियाना’ची मागणी 

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल- मंत्री सुधीर मुनगंटीवार

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta