vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

एसटी संप बाबत ,भाजपचे नेते गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्याचं आवाहन

एसटी संप:

महाराष्ट्राला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा- पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना आवाह:

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्याचं आवाहन

 

मुंबई प्रतिनिधी  दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सं प सुरु आहे. मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर परतले असले तरी पुर्ण क्षमतेने एसटी वाहतुक सुरु झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बैठक घेतली होती. याबाबत आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांना संपाबाबत तोडगा काढण्याचं आवाहन केलं

 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज सर्वात अगोदर सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एकजूटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार यांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले. मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची आहे की, आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल.

संबंधित पोस्ट

दिल्ली ढोल वाले यांच्याकडे खासदार संदिपान भुमरे यांची भेट….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट,काँग्रेसह विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड..

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा

कोल्हापूरच्या विकासावर भाष्य करताना हद्दवाढ किती अत्यावश्यक असल्याचे सांगत हात जोडले… उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  

vishwatmaklokswamivarta

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta