vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

चीनमध्ये कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं ..?

चीनमध्ये कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं ..?

 

विशेष प्रतिनिधी: चिं न बीजिंगमध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून  त्यांच्या नागरिकांवर दडपशाही सुरू असल्याचं कळतंय. चीनमध्ये कोरोना  संसर्गित लोकांना शी जिनपिंग यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून एका मोठ्या बॉक्समध्ये बंद करून ठेवण्यात आल्याचं बातम्यांमधून समोर आलं आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.आत्तापर्यंत दोन कोटी लोकांना चीनमध्ये क्वारंटाईनच्या नावाखाली कैद करुन ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेय. शी जिनपिंग यांनी शून्य कोविड धोरणांतर्गत  नागरिकांवर बंधन घालताना दडपशाहीच्या सीमापार केल्याचं देखील दिसून येत आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार लोकांना मोठमोठ्या बॉक्समध्ये क्वारंटाईन केले जातेय. डेली मेलने यासंदर्भात एक व्हिडिओदेखील जारी केलेला आहे. त्या रिपोर्टनुसार कोरोना संक्रमित रुग्णांना चीनच्या शीआन, आन्यांग आणि युझोऊ प्रांतांमध्ये लोखंडाच्या मोठ-मोठ्या बॉक्सेसमध्ये लोकांना क्वांरटाईन करण्यात येत आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील वेगवेगळ्या बॉक्समध्ये क्वारंटाईन करण्यात येतंय. नागरिक बाधित होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचे कळतेय.

मेलने दिलेल्या रिपोर्ट नुसार आणि इतर शहरांमध्ये जवळपास क्वारंटाईनच्या नावाखाली दोन कोटी लोकांना कैद करण्यात आलंय. शीआनमध्ये एक कोटी 30 लाख लोक त्यांच्या घरांमध्ये क्वारंटाईन आहेत. त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. याशिवाय शेकडो लोकांना बॉक्स मध्ये बंद करण्यात आलेलं आहे. त्या बॉक्समध्ये शौचालयाची देखील सुविधा असून नागरिकांना दोन आठवडे त्या बॉक्समध्ये राहण्यास बंधनकारक करण्यात आलंय. डेली मेलच्या वृत्तानुसार चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये या गोष्टी दिसून येत आहेत

 

संबंधित पोस्ट

हमास म्होरक्याचा खेळ संपला, इस्माईल हनिया ठार, इस्रायलची इराणमध्ये मोठी कारवाई….

vishwatmaklokswamivarta

Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दिला राजीनामा, म्हणाले- मी कोणताही त्याग करण्यास तयार

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये संघर्ष, 27 ठार, 183 जखमी

रशियातील तेलशुद्धीकरण केंद्रांवर युक्रेनचे ड्रोन हल्ले

vishwatmaklokswamivarta

प्रेम-सेक्स : ‘मला एकाच वेळी अनेक पार्टनर पाहिजेत, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मुवुंबी नेडजालामा

vishwatmaklokswamivarta

इराणचा इस्रायलवर हल्ला: हानिये आणि नसरल्लाह यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी डागली 200 च्या वर क्षेपणास्त्रे आयडीएफ ची माहिती