
दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे जल्लोष काँग्रेस कार्यकर्त्यांचा**
मुंबई प्रतिनिधी दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अडओकॅटे अशोक खरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वडाळा सायन विभागातील पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी वडाळा वार्ड क्रमांक 180 मधील कार्यालयात शुभेच्छाचा वर्षाव तर केलाच,परंतु काँग्रेस च्या जिल्हा रोजगार सेल चे अध्यक्ष सुभाष पिसाळ तसेच जिल्हा संघटक सचिव श्री.तानाजी घाग यांनी सायन विधानसभा क्षेत्रातील वरिष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी काँगेस च्या कार्यकर्त्यांची सामाजिक संस्था निर्माण करण्याची घोषणा केली.12 फेब्रुवारी हा अविस्मरणीय दिवस ठरावा व काँग्रेस चा कार्यकर्ता घराघरात-मनामनात पोहीचावा यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला.
यावेळी अडओकॅटे अशोक खरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दक्षिण मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष,महिला कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.एकंदरीत वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निर्माण केला जात आहे.



