vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं निधन

बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं निधन

 

मुंबई प्रतिनिधी बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती.

 

बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी होती.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची 9.36 टक्के दराने परतफेड..

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय 11 जुलै नंतर; अजय चौधरी, नरहरी झिरवळ यांना नोटीसा

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी समुद्राखाली राष्ट्रध्वजाला दिला मानवंदना…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील 139 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे राखीव

vishwatmaklokswamivarta

आगामी काळातील सण, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी