vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नकारात्मकता’ कशी येते ते पहा.**मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी*

*नकारात्मकता’ कशी येते ते पहा.**मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी*

 

मानसशास्त्रामध्ये एक *प्रसिद्ध सिद्धांत आहे*, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी!

 

काही *मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन* एक प्रयोग केला,

 

एका नव्याकोऱ्या, अलिशान, *चकचकीत आणि देखण्या* हॉटेलचा शुभारंभ होता,

 

आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय *भव्यदिव्य आणि सुंदर होते*.

 

त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि *तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात* आला होता.

 

हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला *हजारो लोकांना आमंत्रण* दिले गेले होते.

 

पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा *वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी* ठरवले.

 

त्यांच्या सांगण्यावरुन *हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये* पोहोचल्याबरोबर दिसणारी,

 

अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर *टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन* बाजुला काढुन ठेवण्यात आली.

 

आता एक वेगळीच गंमत सुरु झाली,

 

हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा *त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला* खरा,

 

पण आल्याबरोबर काही क्षणात *त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच* वारंवार जाऊ लागले.

 

शेकडो लोकांनी एकमेकांना *ती मिसिंग टाईल दाखवली*, त्याच्यावर चर्चा केली,

 

ही टाईल बसवायची राहीली का?

 

का ती बाजुला गळुन पडली? *ह्यावर तावातावाने वादविवाद झडू लागले*.

 

हॉटेल मालकाच्या ह्या एका *निष्काळजीपणा मुळे हॉटेलच्या सौंदर्याला गालबोट लागले* आहे, असेही शेकडो जणांनी बोलुन दाखवले.

 

एवढेच नाही, त्या हॉटेलमध्ये आल्यावर पाहुण्यांना कसे वाटले, ह्याविषयी *पाहुण्यांना फिडबॅक भरुन द्यायचा* होता,

 

त्यामध्ये बहुतांश जणांनी अगदी थोडक्यात हॉटेलची डिझाईन, तिथले इंटेरीअर, तिथले लॅंडस्केपींग आणि तिथल्या महागड्या *कलाकुसरीच्या वस्तु ह्याविषयी अगदी थोडक्यात* लिहले,

 

आणि *मिसिंग टाईल बद्द्ल अगदी* भरभरुन लिहले.

त्या हॉटेलमध्ये जागोजागी, *एकाहुन एक देखणी, आकर्षक शिल्पे* ठेवण्यात आली होती,

 

पाहतच राहाव्यात अशा *सुंदर सुंदर पेंटींग्ज* होत्या,

 

*आकर्षक रंगसंगती असलेल्या* अनेक भिंती होत्या,

 

मानसशास्त्रज्ञांच्या सांगण्यावरुन *एका मोठ्या पांढऱ्याशुभ्र भिंतीवर मात्र दोन काळे डाग जाणुनबुजुन ठेवण्यात* आले होते.

 

खरेतर ते डाग इतके छोटे होते की *एकुण भिंतीच्या दहा टक्के सुद्धा* त्यांचा आकार नव्हता,

 

पण मिसींग टाईल प्रमाणे ह्या *डागांकडेही लोकांचे चटकन* लक्ष जाऊ लागले.

 

लोक एकमेकांना उत्साहाने *ते डाग दाखवू* लागले,

 

सगळे काही इतके छान बनवले, *पण हे दोन डाग मात्र तसेच राहीले* ह्याबद्द्ल आश्चर्य व्यक्त करु लागले.

 

काही काही अतिउत्साही लोक तर फक्त बांधकामातल्या *फक्त चुकाच शोधु लागले*,

 

एकमेकांना टाळ्या देऊन हॉटेलमधल्या *उणीवा सेलिब्रेट* करु लागले.

 

शेवटी हॉटेलच्या उदघटनाच्या कार्यक्रमात मानसशास्त्रज्ञांनी *आपल्या प्रयोगाविषयी खुलासा केला*,

 

“आल्याबरोबर लॉबीमध्ये दिसणारी *मिसींग टाईल* जाणुन बुजुन काढुन ठेवण्यात आली होती,”

“मोठ्या पांढऱ्याशुभ्र *पडद्यावर दोन डाग* मुद्दाम उमटवण्यात आले होते”,

 

आणि *माणसांचे ह्या दोन्ही गोष्टींवरचे* प्रतिसाद जाणुन घ्यायचे होते,

 

आणि *रिझल्ट धक्कादायक* म्हणावा असाच होता,

 

हॉटेलमध्ये स्तुती कराव्यात अशा शेकडो, हजारो गोष्टी मांडुन ठेवण्यात आलेल्या असतानाही, *बहुतांश लोकांनी फिडबॅक फॉर्ममध्ये मिसींग टाईल आणि डागांचाच* उल्लेख केला होता,

 

मित्रांनो,

कमतरता शोधणं, पाहताक्षणी चुका काढणं, *दोष काढुन नावं ठेवणं, ही माणसाची वृत्ती जन्मतः असते* का?

नाही,

पण जसजसे आपण मोठे होतो, आपल्याला कमतरता आणि *उणीवा शोधण्याची सवय लागते*,

 

मग कधी आपण *दुसऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या वाईट* गोष्टींकडे बोट दाखवतो, त्यावर चर्चा करतो,

 

तर कधी आपण स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मोजत बसण्यात *आपली बहुमुल्य उर्जा आणि बहुमुल्य वेळ* खर्च करतो.

 

“मला योग्य ते *शिक्षणच मिळाले* नाही.”

 

“माझा जन्म *गरीब घरात* झाला.”

 

“माझा जन्म अशा जातीत झाला, *जिथे मला संधीच* उपलब्ध नाही.”

 

“माझे आई वडील *शिकलेले* नव्हते.”

 

“माझ्याजवळ *खानदानी संपत्ती नाही*, जमीन नाही.”

 

“माझ्या वडीलांनी माझ्यासाठी *कसलेच बॅकअप तयार केले नाही*, मला भांडवल दिले नाही.”

 

“माझ्याजवळ *बुद्धी नाही*.”

 

“माझ्याजवळ *डिग्री नाही*.”

 

“घरच्या परिस्थितीमुळे मी *मनासारखे शिक्षण घेऊ* शकलो नाही.”

 

“मी दिसायला *तितकी सुंदर* नाही.”

 

“माझा *जोडीदार* मला *हवा तसा मिळाला नाही*, म्हणुन माझी प्रगती शक्य नाही.”

 

ह्या आणि अशा कित्येक मिसिंग टाईल्स शोधणं, आणि त्यावर चर्चा करणं, *हा मुर्खपणा आहे, असं तुम्हाला* वाटत नाही का?

 

ज्याला *आयुष्यात काही मिळवायचे आहे* तो आजुबाजुला *लपलेल्या संधीकडे* पाहणे शोधतो.

 

ज्याला आयुष्यात काही करायचेच नाही, *तो मात्र फक्त काम न करण्याचेच* बहाणे शोधतो.

 

म्हणून *उणिवांकडे पाहत बसण्यापेक्षां आपल्या अवती भवती काय पॉझीटिवीटी आहे याच्याकडे लक्ष केंद्रित केले तर* जीवनच बदलून जाईल *नाही का* ?✌️

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाचे प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा येथे उद्धाटन

vishwatmaklokswamivarta

लक्षात ठेवा की भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.

vishwatmaklokswamivarta

_जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा…_*👇🏻

vishwatmaklokswamivarta

स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान;जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक सामाजिक अध्यात्मिक आरोग्य जपले पाहिजे -डॉ.प्रकाश शिगेदार* 

vishwatmaklokswamivarta