vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

आपण काय शोधत असतो?*

*आपण काय शोधत असतो?*एका शाळेत गणिताच्या वर्गामध्ये, गणिताच्या बाई फळ्यावर खालील आकडे लिहीत होत्या-

 

9 x 1 = 7

9 x 2 =18

9 x 3 = 27

9 x 4 = 36

9 x 5 = 45

9 x 6 = 54

9 x 7 = 63

9 x 8 = 72

9 x 9 = 81

9 x 10 = 90

 

बाई फळ्यावर वरील आकडे लिहीत असतांनाच विद्यार्थ्यांमध्ये खुसपुस सुरू झाली. ‘बाईंना एव्हढे कळत नाही का?’ पासून ‘बाई अगदी येडपट आहेत’ पर्यंत वाक्ये कानावर येऊ लागली.

बाईंना मुले काय म्हणतात, त्यांची कशी टिंगल टवाळी करतात हे समजत होते, उमजत होते, ऐकू येत होते. पण तरीसुद्धा बाई मुलांकडे पाठ करून शांतपणे फळ्यावर आकडे लिहीत होत्या.

आकडे लिहून झाल्यावर त्या मुलांकडे वळल्या व शांतपणे म्हणाल्या, ‘काय झाले? तुम्ही मुले हसता का आहात?’

‘बाई तुमच्या हातून एक गंभीर चूक झाली आहे!’ एक स्मार्ट मुलगी चटकन उभे राहून म्हणाली. हे बोलताना ‘बाई किती येडपट आहेत’ हाच भाव तिच्या चेहेऱ्यावर होता.

‘असं? कोणती चूक?’ बाईंनी शांतपणे विचारले.

‘अहो बाई 9 x 1 = 9 होतात, तुम्ही 7 लिहीले आहे!’ दुसरा स्मार्ट मुलगा म्हणाला. बोलतांना त्याच्या चेहेऱ्यावर ‘बाईंना कसे पकडले!’ असे भाव होते. (कधी कधी बॉडी लँग्वेज शब्दांपेक्षा जास्त बरोबर बोलत असते.)

‘ठीक आहे!’ बाई म्हणाल्या, ‘पण बाकीचे आकडे तर बरोबर आहेत ना?’

‘होय! बाकीचे आकडे बरोबर आहेत!’ सर्व मुलांनी माना डोलावल्या.

‘मी एकूण 10 आकडे लिहीले आहेत. त्यातील 1 आकडा चुकला आहे व 9 आकडे बरोबर आहेत, असेच ना?’ बाईंनी विचारले.

‘होय, बरोबर आहे!’ सगळी मुले म्हणाली.

‘याचा अर्थ, जर टक्केवारीत बोलायचे झाले तर मी 10 टक्के चूक केली पण 90 टक्के बरोबर होते, असे म्हणावे लागेल. बरोबर?’ बाई म्हणाल्या.

‘होय’ सगळी मुले म्हणाली.

‘पण तुम्ही सर्वांनी मी केलेल्या चुकीकडेच कॉन्सट्रेशन केले. तुम्ही मला मूर्ख, बावळट, येडपट ठरवलेत. बाईंना एवढे सुद्धा कळत नाही का? असे म्हणाला. पण मी जे 9 आकडे बरोबर लिहीले त्याबद्दल काहीच बोलला नाहीत!’ बाई म्हणाल्या.

‘त्यात काय सांगायचे?’ ती स्मार्ट मुलगी म्हणाली.

‘याचा अर्थ तुमच्या सर्वांच्या दृष्टीने मी केलेली 10 टक्के चूक ही जास्त महत्वाची, पण मी जी 90 टक्के बरोबर आहे त्याला काहीच किंमत नाही, असेच ना?’ बाईंनी विचारले. सर्व मुले गप्प बसली.

‘मी मुद्दामूनच पहिला आकडा चुकीचा लिहीला होता. कारण मला तुम्हाला आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा धडा शिकवायचा आहे.

नेहमी लक्षात ठेवा की लोक नेहमी तुमच्या चुकांकडेच बघत असतात व त्यावरून ते तुम्हाला मुर्ख, बावळट, येडपट किंवा युजलेस ठरवत असतात. पण तुम्ही जे काही बरोबर करत असता त्याबद्दल ते कधीच बोलत नसतात, किंवा तुमचे कौतुक करत नसतात.

मनुष्य म्हटला की तो चुकतोच. ‘To errer is a human being’ अशी एक म्हणपण आहे. खरे म्हणजे आपण 10 टक्यांपेक्षा जास्त चुका करत नसतो. पुष्कळ वेळा आपण 90 टक्के बरोबर असतो. पण या 10 टक्के चुकांमूळे आपल्याला बोलणी खावी लागतात, कुचेष्टा सहन करावी लागते, आपली लायकी किंवा इभ्रत काढली जाते. यामध्ये आपले मित्र, शेजारी पाजारी, इतकेच नव्हे तर कुटुंबातले लोक पण सामील असतात. त्यामूळे आपल्या आत्मविश्वासाला पण तडा जात असतो.

पण आपण जे 90 टक्के बरोबर असतो, आपले विचार बरोबर असतात, निर्णय योग्य असतात, वागणूक उत्तम असते, याबद्दल तुम्हाला कोणीही ऍप्रिसिएट करत नाही. जीवनाचे हे कटू सत्य जाणून घ्या.

पण तुम्ही असे होऊ नका. माणसांच्या चुका शोधून काढताना त्यांनी काय बरोबर केले आहे, त्यांचे कोणते विचार बरोबर आहेत, कोणते निर्णय बरोबर आहेत हे पण पहात जा!

बाईंचे हे बोलणे मुले ‘स्टन’ होऊन ऐकत होती.

 

आपण पण हेच करत असतो. लोकांच्या चुका शोधून काढण्यामध्ये व त्यावरून त्यांना नांवे ठेवण्यामध्ये आख्खे आयुष्य वाया घालवत असतो.

काही जणांना तर एखाद्या माणसाने केलेल्या चुका शोधून काढण्यात किंवा त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी शोधून काढण्यात कमालीची धन्यता वाटत असते.

आपल्या मराठी समाजात अशा प्रकारच्या लोकांचा भरणा फार मोठ्या प्रमाणावर आहे असे मला आढळून आले आहे. आणि ज्या समाजात अशा ‘कुजक्या’ मनोवृत्तीच्या लोकांचा भरणा जास्त असतो तो समाज फार काही प्रगती करू शकत नाही.

अर्थात लोकांनी केलेल्या 10 टक्के चुकांना महत्व द्यायचे का त्यांनी केलेल्या 90 टक्के बरोबर गोष्टींना महत्व द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे.

 

*©उल्हास हरी जोशी,* मोः-9226846631/8308462259

(आवडल्यास शेअर करतांना कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)

संबंधित पोस्ट

Motorolaचा तहलका! आता हवेतून चार्ज होणार स्मार्टफोन, असा करा झटपट Full Charge

Super Admin

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

Super Admin

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती- नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

UPI पेमेंट करत असाल तर सावधान; या गोष्टींमुळे तुमची फसवणूक होऊ शकते

Super Admin

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय/शिफारशी पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta