vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई : रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत

मुंबई त  रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत…

 

मुंबई प्रतिनिधीमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वाढते ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी पावले उचलली आहेत. ध्वनिप्रदूषणाची कारणे शोधून त्यांनी त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे ध्येय आहे, अशी माहिती पांडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

 

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर नाॅईस अंडर कंट्रोल मोहीम आखण्यात आली असून त्यात रात्री दहा ते सकाळी सहादरम्यान बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. आता रविवारचा दिवस ध्वनिप्रदूषणमुक्त ठेवण्याचे ध्येय आहे. रविवारी बांधकाम बंद ठेवण्याचा विचार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे.शहर आणि उपनगरांत अनेक रस्त्यांच्या कडेला व पुलाच्या खाली भंगार अवस्थेत वाहने पडून असतात. त्यासंदर्भातही अनेक नागरिकांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुंबई पोलिस आणि पालिकेसह ‘रिमूव्ह खटारा मोहीम’ राबवण्यात आली. त्यानुसार सोमवारी (ता. २१) २७३ भंगार वाहने हटविण्यात आली, अशी माहितीही पांडे यांनी ट्विटरद्वारे दिली.

संबंधित पोस्ट

धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही. धनुष्यबाण  नेमकी उद्धव ठाकरे  यांचा की एकनाथ शिंदेंचा  याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार …

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथ मध्ये धक्कादायक बातमी, दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली आणि…

बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी तीन कत्तलखान्यांना परवानगी.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा …कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta