vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही. धनुष्यबाण  नेमकी उद्धव ठाकरे  यांचा की एकनाथ शिंदेंचा  याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार …

धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही. धनुष्यबाण  नेमकी उद्धव ठाकरे  यांचा की एकनाथ शिंदेंचा  याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार …

 

मुंबई प्रतिनिधी

धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा विवादावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटात ने 30 जानेवारी ला लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेतआज सुमारे 4 तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की, शिंदे गटाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालं नाही.

धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेलं नाही. धनुष्यबाण (Dhanushyaban) नेमकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा की एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) याचा अंतिम फैसला आता 30 जानेवारीला होणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोग आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर 30 जानेवारील अंतिम निर्णय देणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. यानंतर निवडणूक आयोगाने दोनही गटांना सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे. सोमवारी लेखी उत्तर आल्यावर निवडणूक आयोग निकालाची तारीख देणार आहे. आज ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. तसेच महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्यावतीने युक्तीवाद केला.

आज सुमारे 4 तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाला मिळणार की, शिंदे गटाला मिळणार? या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालं नाही. सुनावणीदरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.

संबंधित पोस्ट

पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक तासापूर्वी  हेलिकॉप्टर कोसळले खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती दोन सुखरूप दोन जखमी..

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*

मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेची विशेष तयारी..

नवी मुंबईत परीक्षेच्या दिवशी 12वीचा विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू..

vishwatmaklokswamivarta