vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक झाली.

बैठकीस आमदार रवीशेठ पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, सहसचिव गीता कुलकर्णी, तसेच मुख्य अभियांता प्रशांत भामरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहू नये. अधिकारी व अभियंते यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून जलस्रोत, पाइपलाइन, पंपिंग स्टेशन इत्यादींचा आढावा घेऊन त्वरित सुधारणा कराव्यात. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. शहापाडा परिसरातील सर्व गावे आणि वस्त्यांपर्यंत स्वच्छ आणि पुरेसे पाणी पोहोचेल, यासाठी नियोजन आणि समन्वयांनी कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

OOOO

 

संबंधित पोस्ट

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री प्रताप सरनाईक दर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलडाणा जिल्ह्यात २४ जूनअखेर सरासरी ३३.२ मि.मी. पावसाची नोंद; शेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीनागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..