vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीनागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीनागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

            सांगली, प्रतिनिधी : भ्रष्टाचार करणे कायद्याने गुन्हा आहे. लाच मागणे व घेणे हाच फक्त गुन्हा नसून लाच देऊ करणे हा सुध्दा गुन्हाच आहे. कोणी लाच देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्ती विरूध्द सुध्दा भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येतो. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर प्रत्येक नागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.

 जिल्हा व सत्र न्यायालय येथे सांगली वकील बार संघटना व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भ्रष्टाचार निर्मुलन विषयावर आयोजित जनजागृती शिबीर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सर्व न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी तसेथ पक्षकार उपस्थित होते.

     प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे म्हणाले, भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती केल्याने सामान्य माणूस यापासून काहीतरी बोध घेऊन लाच घेणाऱ्यास व देणाऱ्यास कायद्याच्या माध्यमातून शिक्षा देऊ शकतो. सार्वजनिक हितासाठी आणि संस्थेच्या कल्याणासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. भ्रष्‍टाचार संपवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून यासाठी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दक्षता आणि सचोटीची भावना वाढविणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दक्षता आपली सामायिक जबाबदारी याबाबत माहिती सांगितली. भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्यासाठी आपण स्वतःपासून सुरूवात केली पाहिजे. आपणच कोणालाही लाच द्यायची नाही व कोणी लाच घेत असेल तर संबंधीत यंत्रणेला याची कल्पना द्यावी व देशाचे चांगले आदर्श नागरिक बनावे व देशाची प्रतिमा उंचवावी असे सांगितले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात योग्य पध्दतीने वापर केला आणि कायद्याचे पालन केले, तर सकारात्मक परिणाम कुटूंब, समाज आणि राष्ट्रावर होतो आणि त्याचा योग्य परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्याही ठिकाणी कामांमध्ये सुलभता निर्माण करणे, भ्रष्टाचाराला वाव न देणाऱ्या कार्यपध्दती विकसित करणे, जनतेच्या तक्रारीवर योग्य कार्यवाही करणे व लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे असे त्यांनी सांगितले.  सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अड. अशोक दत्तात्रय वाघमोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अड. शशिकला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अड. दिपक कदम यांनी आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महिलासक्षमीकरणप्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भिवंडीच्या ‘भावना’ झाल्या स्वावलंबी-ब्युटी पार्लर व्यवसायातून कोरली यशाची नवी पाऊलखूण!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सुकन्या समृद्धी’ व ‘आरडी’ खाते उघडा;16 मार्चपासून अमरावतीत विशेष मोहीम

प्रियदर्शनी कॉलनी संभाजीनगर येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करा- भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta