
100 कोटी खंडणीप्रकरणी: CBI ने घेतला अनिल देशमुख यांच ओथर रोड जेल रोड जेल मधून ताबा; थोड्याच वेळात CBI Court मध्ये करणार सादर…
मुंबई प्रतिनिधीअनिल देशमुखांवर काही दिवसांपूर्वीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय कोर्टात त्यांना दाखल करणार आहेत.: शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात काल विशेष सीबीआय कोर्टानं सचिन वाझेसह तिघांना सीबीआयची कोठडी सुनावली होती. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील सीबीआयची कोठडी मिळण्याची शक्यता होती. पण त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, यशस्वी उपचारांनंतर त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला
एएनआयच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना शनिवारी खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयातील ऑर्थोपिडिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी यशस्वी उपचारांनंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर आता त्यांना आत्ता रोड तुरुंगातून सीबीआयने ताब्यात घेतले आहे आणि लवकरच कोर्टात हजर करणार



