vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इंधन दरवाढीने नागरीकांची होरपळ; CNG-PNG च्या किंमतीतही मोठी उसळी…

 इंधन दरवाढीने नागरीकांची होरपळ; CNG-PNG च्या किंमतीतही मोठी उसळी…

 

मुंबई प्रतिनिधी

इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. एमएमआर म्हणजेच मुंबई आणि परिसरात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजी प्रति किलो 5 रुपयांनी, तर PNG साडेचार रुपयांनी महागलाय.

 

महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ जाहीर केलीय. या नव्या दरवाढीमुळे सीएनजीचा दर किलोमागे 72 रुपये झाला आहे तर घरगुती पाईप म्हणजे PNG चा दर आता किलोमागे 45.50 रुपये इतका झाला.

 

1 एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र सलग दोन वेळा झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचलेत.

 

त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालंय. या दरवाढीमुळे आता टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यातही दरवाढ

सीएनजीचे दर मध्यरात्रीपासून पुणे शहरात 68/ Rs per kh, रुपये प्रति किलोवरून 73/rs per kg, रुपये वाढले

 

पुण्यातही सीएनजी गॅस महागला

या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूच्या वाढीमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.

संबंधित पोस्ट

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विधासभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जालना जिल्हा विधानसभा मतदार संघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेश येथील माफिया-राजकारणी आणि अतिक अहमदला आणि त्याचा भाऊ  अश्रफ हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला

vishwatmaklokswamivarta

शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना जो शब्द दिला होता त्याची पूर्तता करता आली याचे खरे समाधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे आवंटनपत्र बहाल

vishwatmaklokswamivarta

मुंबईत वाढू लागले प्रदूषण, मुंबई महानगरपालिका सक्रीय, प्रदुषण नियंत्रणासाठी उपाययोजना सुरु…

vishwatmaklokswamivarta

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

vishwatmaklokswamivarta