
ठाकरे परिवारांच्या प्रॉपर्टी कधी जप्त होणार? असा सवाल भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी केला
मुंबई प्रतिनिधी
धारावी नाईंटी फिट रोड येथे कामराज शाळेसमोर आज झालेल्या जाहीर सभेत भारतीय जनता पार्टी- धारावी विधानसभा युवा मोर्चा यांनी केलेल्या जाहीर सभेत पोल-खोल सभेच्या महागडी सरकार आरोप करत ठाकरे सरकारच्या प्रॉपर्टी या कधी जप्त होणार असा सवाल भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला
धारावी नाईंटी फिट रोड येथे कामराज शाळेसमोर आज झालेल्या जाहीर सभेत भारतीय जनता पार्टी- धारावी विधानसभा युवा मोर्चा यांनी केलेल्या जाहीर पोल-खोल सभेच्या महागडी सरकार बोलत असताना किरीट सोमय्या म्हणाले की
नुकतेच भ्रष्टाचारांच्या पुराव्यासह महा विकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांसह संपूर्ण कागदपत्रे माहिती दिल्ली येथील ई डी अधिकाऱ्यांना भेटून दिली असल्याची माहिती सांगत त्यांनी महा विकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी अनेक नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली असल्याचे सांगितले, अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी सरकारला सादर करून शासन कारवाई करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .
याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील विविध कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी जमवलेल्या प्रॉपर्टी यांच्यावर कधी कारवाई होणार असे सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेतील घोटाळा लवकरच उघडकीस येणार, महा विकास आघाडी सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे सांगून त्यांनी सर्व कागदपत्रे व इतर कार्यालयांना देऊन त्यांच्यावर कारवाई साठी त्यांचा मी पाठपुरावा करत लवकरच कारवाई होणार अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे महा विकास आघाडीच्या अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून त्यांनी रोखठकपणे प्रत्येक भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी भारतीय जनता पार्टी सायन कोळीवाडा विधानसभा आणि धारावीचे प्रभारी आमदार कॅप्टन आर तमिल्सेलवण, श्री आचार्य पवन कुमार* *त्रिपाठीजी*मां श्री राजेशजी शिरवडकर गोवर्धन चौहान -मंडळ संयोजक ,शामू मैत्रे -मंडळ अध्यक्ष अनिल वोरणी, संजय गुप्ता, मोहम्मद शेख, धीरज कडू💥 युवा वॉर्ड अध्यक्ष-
मार्टिन झेवीयर -183 वॉर्ड अध्यक्ष सतीश व्हाटकर -184 वॉर्ड अध्यक्षअरुण मोदी -185 वॉर्ड अध्यक्ष गणेश सोनावणे -186वॉर्ड अध्यक्ष रवी भोरे -188 वॉर्ड अध्यक्ष मुन्ना शेख -189 वॉर्ड अध्यक्ष भाजपा नेते मुंबई सचिव मनी बालन जिल्हा सचिव रमेश नाडार भाजपा मुंबई च नेते रमाकांत गुप्ता, महिला सर्व कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी नागरिक मोठ्या च्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपाचे महिला सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते



