vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेस अद्यापही परवानगी नाही, मनसेकडून मात्र टीझर प्रदर्शित; पोलिसांकडून जमावबंदी आदेश

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेस अद्यापही परवानगी नाही, मनसेकडून मात्र टीझर प्रदर्शित; पोलिसांकडून जमावबंदी आदेश…

मुंबई प्रतिनिधी

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझरr राज ठाकरे यांनी पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्यापही परवानगी दिली नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे येथील सभेत जाहीर केलेल्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे जोरदार तयारी करत आहे. औरंगाबाद पोलीसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे ही सभा होणार की नाही याबाबत अद्याप निश्चितता नाही. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मात्र ट्विटरवरुन मनसेच्या या सभेचा एक टीझर (Raj Thackeray Aurangabad Rally Teaser) पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. एका बाजूला मनसेच्या सभेबाबत उत्सुकता असताना दुसऱ्या बाजूला मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेला अद्यापही परवानगी दिली नाही.

शिवाजी पार्क येथील मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा चर्चेत राहिला. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत भूमिका घेतली होती. राज यांनी केलेल्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटले. मनसेवर चौफेर टीकास्त्र झाले. मनसेतही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकूणच गोंधळाचे वातावरण पाहून आठ दिवसांमध्ये मनसेने ठाणे येथे दुसऱ्या सभेचे आयोजन केले. या सभेला त्यांनी उत्तरसभा असे नावही दिले.

संबंधित पोस्ट

मुंबईत कबुतरखाना बंदी कायम – सर्वोच्च न्यायालय

दिपावली पुजन* “मुहूर्त” दि. १७|१०|२०२५ शुक्रवार…. एकादशी सह    *वसुबारस* सायं ६.नंतर सवत्स गाईचे पूजन करावे.(गुळाचा नैवेद्य दाखवला)

vishwatmaklokswamivarta

कसौटी जिंदगी की’ आणि ‘कट्टी बट्टी’ यांसारख्या शोमध्ये दिसणारे प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

विविध कार्यालय, आस्थापनांनी फलकासह  मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक

महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta