vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय अटक केली

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने( सीबीआय)  अटक केली

 

व्यावसायिक प्रतिनिधी. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण २०१८ मधील असून, त्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले. त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम अविनाश भोसले यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने १ मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीमही राबवली होती.

 

येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये तीन हजार ७०० कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते.

यात राणा यांना ६०० कोटी रुपयांची मिळाल्याचा आरोप आहे. त्यानंतर डीएचएफएलने भोसले यांच्याशी संबंधित कंपनीत पैसे वळते केले होते. त्याच्यासोबत बांधकाम व्यावसायिक सुनील छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपकडेही हे पेसै गेल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते.

सीबीआयने केलेल्या तपासणीत गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळती करण्यात भोसले यांचा प्राथमिकदृष्टय़ा सहभाग आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अविनाश भोसले पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.

 

संबंधित पोस्ट

जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची   –पालकमंत्री उदय सामंत  

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

लालू प्रसाद यादव यांच्या 17 ठिकाणांवर सीबीआयचे छापे; भ्रष्टाचाराचा आरोप

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात; शाळेची बस दरीत कोसळून 10 ठार