vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे- बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी: गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या, वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले

000000

संबंधित पोस्ट

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन