vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात कर्ज बुडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्ज बुडविल्याप्रकरणी कंबोज यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wings) ही कारवाई केली आहे.

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या आडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्ज बुडविल्याप्रकरणी कंबोज यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wings) ही कारवाई केली आहे. फसवणूक करणे आणि कट रचणे असा कंबोज यांच्यावर आरोप आहे. याच आरोपांवरुन आर्थिक गुन्हे शाखेने कारवाईस सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार कंबोज यांच्यावर मंगळवारी (31 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

इंडियन ओव्हरसिज बँकेकडून मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी ज्या कारणासाठी घेतले त्या कारणासाठी वापरलेच नाही. त्या ऐवजी त्यांनी ती रक्कम इतर ठिकाणी वळवली. वरुन कर्जही बुडवले, असा ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या वरुन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कंबोज यांच्यासोबतच या कंपनीचे संचालक असलेल्या दोघांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कंबोज यांनी आपल्यावरील सर्व ओरोप फेटाळून लावले आहेत. त्याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे

 

संबंधित पोस्ट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टावर टीका करणे भोवण्याची शक्यता

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणार,भाजपा नेते किरीट सोमय्या..  

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शरद पवार आणि इतर नेत्यांची बैठक सुरु

खोक्यांचा विषय हा ‘मातोश्री’ला…”; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर,वेदांतावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

vishwatmaklokswamivarta

नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील…