vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणार,भाजपा नेते किरीट सोमय्या..  

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणार,

भाजपा नेते किरीट सोमय्या..

 

मंत्रालय  प्रतिनिधी: जरंडेश्वर साखर कारखाना  शेतकऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी किरीट सोमय्या  ईडी कार्यालयात गेले होते. काही दिवसांपूर्वी हा कारखाना ईडीने जप्त केला होता. त्यामुळे हा कारखाना शतेकऱ्यांना परत द्यावा, अशी मागणी सोमय्यांनी लावून धरली आहे. आज त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन ईडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. याबाबत स्वतः सोमय्यांनी माहिती दिली आहे.

बेकायदेशीररित्या लिलाव करून हा कारखाना २०१० साली घेण्यात आला. यासाठी आम्ही तब्बल १२ वर्ष तालुका न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. हायकोर्टाच्या निर्णयानंतर हे प्रकरण ईडीकडे गेलं. आता ईडीने चौकशी केली आहे. त्यानंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही सोमय्यांना विनंती केली होती, की हा कारखाना परत मिळवून द्यावा. या मागणीसाठी आम्ही ईडी कार्यालयात आलो होतो”, असं जरंडेश्वर साखर कारखान्याचे सभासद पोपटराव जगदाळे म्हणाले. ईडीने सहमती दर्शवली -किरीट सोमय्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप केले होते. हा साखर कारखाना कमी किंमतीत अजित पवारांच्या नातेवाईकांना विकल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने चार महिन्यांपूर्वी कारखाना जप्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. त्यामुळे किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात गेले होते. कारखाना शेतकऱ्यांना चालविण्यासाठी देण्यात यावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. ”अजित दादांना न्यायालयाने उत्तर दिले आहे. ईडीने हा कारखाना जप्त केला आहे. त्यानंतर न्यायालयानं या जप्तीला दुजोरा दिला. अजित दादांचा काही संबंध नाहीतर मग ते बोलतात कशाला? कारखाना शेतकऱ्यांना परत देण्यासाठी ईडीने सहमती दर्शवली आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील राजकारण: आमच्यात कोणतेही भांडण नाही, शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे वक्तव्य…

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे ही मागणी…. विश्व वारकरी सेना

vishwatmaklokswamivarta

धुळे जिल्ह्यात भाजपने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपक्ष उमेदवाराची लोकसभा निवडणुकीत उडी

विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार