vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

हैदराबाद प्रतिनिधी

 

मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची  घोषणा करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या  मुहूर्तावर सीएम केसीआर आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची घोषणा करतील, असं मानलं जात आहे.

विजयादशमी दिवशी 5 ऑक्टोबरला हैदराबाद तेलंगणा भवनमध्ये  टीआरएस (TRS) पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, सीएम केसीआर हैदराबादच्या बैठकीनंतर राष्ट्रीय राजकारणाबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलू शकतात. पक्षाचं नाव बदलण्यासाठी टीआरएस पक्षाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार असल्याचंही मानलं जात आहे.

केसीआर 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीत जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. टीआरएस नेते श्रीधर रेड्डी म्हणाले, “देशातील लोक एक मजबूत आणि चांगलं नेतृत्व शोधत आहेत. कारण, एनडीए सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे.” तर

 

, दुसरीकडं तेलंगणा पीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष आणि माजी खासदार मधू गौड यास्की म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी तेलंगणातील जनतेचा विश्वासघात केलाय आणि आता ते देशाच्या जनतेचा विश्वासघात करू इच्छित आहेत, अशी त्यांनी टीका केलीय.

 

 

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरे गटाच्या  नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हात उगारला?, जिल्हाप्रमुखाची तडकाफडकी हकालपट्टी….

हरियाणा निवडणुकांमध्ये मतदानात गडबड झाल्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा म्हणाले,

vishwatmaklokswamivarta

गावठाण विस्तारासाठी दिलेल्या शेती महामंडळाच्या कामगारांना घरकुले देणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी निमित्त राज्यपालांची श्री शृंगेरी शंकर मठाला भेटपंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश…

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी…