
दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राज ठाकरे यांनी तुम्हाला ‘सामना’चे संपादक बनवलं संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बदलांचे वारे वाहत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (MNS) दरम्यान, आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे
संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राज ठाकरे यांनी तुम्हाला ‘सामना’चे संपादक बनवलं आहे, असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे
दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापयला लागलं आहे. खासदार संजय राऊत यांनी यादरम्यान अनेक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी टीकाही केली आहे. आता मनेसनेही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जुन्या आठवणींचा पुरावा देत मनसेने त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे राऊत आणि मनसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार का अशी चर्चा आहे.



