vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी…

 खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी…

 

मुंबई प्रतिनिधी: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी संजय राऊतांनविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती.

 

कोर्टानं समन्स बजावूनही राऊत कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यावरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रं सादर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

 

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात युवा प्रतिष्ठान या संस्थेने शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या युवा प्रतिष्ठान संस्था चालवतात.

 

तर कोणतेही पुरावे नसताना आपली बदनामी झाल्याचा आरोप मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी केला आहे. संजय राऊत यांना आता 18 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

 

कोर्टाने संजय राऊत यांना 4 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. पण राऊत किंवा त्यांचे वकिल सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी आम्ही अरज् दिला आणि तो न्यायालयाने मान्य केला अशी माहिती मेधा सोमय्या यांचे वकिल अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी दिली.

संबंधित पोस्ट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta

ED कार्यालयाचा नवीन पत्ता, जिथे ड्रग्ज तस्कर इक्बाल मिरचीने पब थाटला, तिथेच आता ईडीचे नवे कार्यालय…

vishwatmaklokswamivarta

COVID-19: भारतात पाठिमागील 24 तासात 2,858 जणांना कोरोना संसर्ग, 11 जणांचा मृत्यू

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta