vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरण :वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

भीमा कोरेगाव प्रकरण: वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ…

नवी दिल्ली प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Case) प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ पी वरावरा राव (Dr P Varavara Rao) यांना वैद्यकीय कारणास्तव दिलेला अंतरिम जामीन मंगळवारी (12 जून) वाढवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Case) प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ पी वरावरा राव (Dr P Varavara Rao) यांना वैद्यकीय कारणास्तव दिलेला अंतरिम जामीन मंगळवारी (12 जून) वाढवला आहे. न्यायाधीश यूएल ललीत, न्यायाधीश रविंद्र भट आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने राव यांची याचिका 19 जुलैपासून नियमीत सुनावणीला घेतली आहे. दरम्यान, राव यांनी वकिलाच्या माध्यमातून वैद्यकीय कारणासाठी कायमस्वरुपी जामीन मागितला आहे.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) तर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी वरवरा राव यांच्या जामीनाला विरोध करताना म्हटले की, राव यांचा जामीन स्थगित करावा. त्यांना पुन्हा एकदा नव्या याचिकेतील (प्रकरणातील) सुनावणीसाठी कोर्टात उद्या आणि परवा हजर राहावे लागणार आहे. तुषार मेहता यांनी असेही म्हटले की, राव यांना माळालेले अंतरिम संरक्षण हे मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळाले आहे. जे आज संपत आहे. त्यात वाढही केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, राव यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी सॉलिसिटर जनरलच्या विनंतीला हरकत घेतली नाही

 

पक्षकारांसाठी उपस्थित असलेल्या वकिलांच्या संयुक्त विनंतीनुसार, 19 जुलै रोजी प्रकरणाची यादी करा. याचिकाकर्त्याने उपभोगलेले अंतरिम संरक्षण पुढील आदेशापर्यंत त्याच्या फायद्यासाठी कायम राहील,” असे खंडपीठाने सांगितले. काही कागदपत्रे रेकॉर्डवर ठेवण्यासाठी सॉलिसिटर जनरल यांनी स्थगिती देण्याची विनंती केल्यानंतर काल (सोमवार) खंडपीठाने हे प्रकरण मंगळवारी सुनावणीसाठी ठेवले.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

मुंबईवरील  26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

देशातील सर्वच अभियंत्यांना *इंजिनियर्स डे* च्या मनःपूर्वक शुभेच्छा 👏✍🏻

vishwatmaklokswamivarta

10 जुलै रोजी ईद निमित्त कोणत्याही ठिकाणी अवैध्यरित्या जनावरांच्या कत्तली होत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लक्ष्मीनारायण मोदी यांच्या आदेशाचे पालन करा जीव मैत्री संस्था.

vishwatmaklokswamivarta

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

vishwatmaklokswamivarta