vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आसाममधील जोरहाट येथील  घटना इंडिगोचं विमान टेकऑफआधीच धावपट्टीवरुन घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात…

आसाममधील जोरहाट येथील  घटना इंडिगोचं विमान टेकऑफआधीच धावपट्टीवरुन घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात…

आसाम प्रतिनिधी

आसमच्या (Assam) जोरहटमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तुम्ही पावसाळ्यात अनेकदा गाडी चिखलात फसल्याचं बघितल असेल किंवा त्या गाडीला धक्का देवून चिखलातून बाहेरही काढलं असेल. पण आसामध्ये चक्क इंडिगोचं (IndiGo Flight) विमान चिखलात फसल्याची विचित्र घटना घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकालासाठी (Kolkata) 6E757 हे विमान उड्डाण घेणार होते. पण विमान टेकऑफआधीच (Take Off) धावपट्टीवर (Runway) घसरलं आणि किनारी असलेल्या चिखलात फसलं. विमान चिखलात बराच वेळ फसून होतं. विमान पुन्हा धावपट्टीवर नेत टेकऑफ करण्यासाठी पायलटकडून (Pilot) प्रयत्न सुरु होते. पण विमान चिखलात रुतलं होतं, सुमारे दोन तास विमान थांबवल्यानंतर हे उड्डाण अखेर रद्द करण्यात आलं.

 

सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही.  विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. हे विमान धावपट्टीवरून पुन्हा परतलं. उड्डाण रद्द झाल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगोच्या अनेक विमानांचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं आहे. तरी इंडिगोने संबंधित घटना पाहता विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  इंडिगो सेवेसंबंधी बरेच प्रवासी (Traveler) हल्ली सोशल मिडीयावर (Social Media) व्यक्त होताना दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध विमान कंपन्यांच्या विमानांमधील तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेत DGCA ने या घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

संबंधित पोस्ट

पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन ! समीर यांचे निधन, हा व्यवस्थेने घेतलेला बळीच ! – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 29.48 टी.एम.सी.पाणीसाठा,कोयना धरणातून 52 हजार 100 तर वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स विसर्ग..

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता दिंडी सोहळ्यात विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छतेचाही जागर

महाराष्ट्र राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; कोकणात उष्णतेची लाट – हवामान विभाग

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी; मुक्काम आर्थर रोड जेल….

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशात तुरुंगामध्ये असलेल्या. सपा नेते आजम खान, गँगस्टर ते आमदार असा प्रवास केलेले मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांच्याविरोधात चौकशीसाठी ईडीला परवानगी.

vishwatmaklokswamivarta