vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट..

उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट…

 

मुंबई प्रतिनिधीसंजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा  प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने  अटक केली. त्यामुळे दुखावलेल्या कुटुंबीयांना शिवसेना  पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी भेट घेऊन धीर दिला. संजय राऊत यांच्या कुटुंबीयंची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे भांडूप येथील घरी गेले. उद्धव ठाकरे यांना पाहताच राऊत यांचे कुटुंबीय गहीवरले. खास करुन संजय राऊत यांच्या ‘मातोश्री’ भावूक झाल्याचे पाहायाल मिळाले.

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले. संजय राऊत यांचे औक्षण करुन त्यांनी राऊत यांना आशीर्वाद दिले. या वेळी राऊत यांनीही मातोश्रींना चरणस्पर्ष करत आशीर्वाद घेतले. उपस्थितांपैकी सर्वांसाठीच हा क्षण मोठा भावूक होता. संजय राऊत यांना उराशी कवटाळतानाचा त्यांच्या आईचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राऊतांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला. ईडीची कारवाई म्हणजे ही एक सूडाने केलेली कृती आहे. ही एक लढाई आहे. संजय राऊत आपल्या पक्षासाठी लढाई लढत आहेत. त्यामुळे संकटात असलेल्या कुटुंबीयांच्या पाठिशी शिवसेना भक्कमपणे उभा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या कृतीतून दाखवले आहे

संबंधित पोस्ट

उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना- मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक  यांनी संगम प्रतिष्ठान च्या प्रतिनिधींना ग्वाही दिली*कचरावेचकांच्या समस्या आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी संगम प्रतिष्ठान चे निवेदन

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा