vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड विचारत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तर गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

अमरावती आणि नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, रस्त्यांची कामे निवडताना त्यांची निकड आणि तातडी या बाबी विचारत घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करुन जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठरवून काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्धरितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावीत, असे त्यांनी सांगितले.आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्यादृष्टीने बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.अमरावती विभागातील अचलपूर – बडनेरा – यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सूचना मंत्री श्री. बावनकुळे यांनी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना दिली.

0000

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी: जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे*  *कृषी दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न* 

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..