vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महागाई वाढल्याने आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता …

मुंबईत महागाई वाढल्याने आता पुन्हा  रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता…

मुंबई प्रतिनिधी रिक्षा प्रवासात तीन रुपये, तर टॅक्सी प्रवासात चार रुपये वाढ होण्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी व्यवसायावर परिणाम झाला असून उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याचे टॅक्सीचालक सांगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी प्रलंबित आहे. येत्या आठवडाभरात या प्रलंबित मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्याने आता पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी दरवाढीची दाट शक्यता आहे.

सीएनजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्याशिवाय महागाईतही वाढ झाल्याने टॅक्सी संघटनांनी प्रवास भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत रिक्षा, टॅक्सी संघटना आणि परिवहन विभागाची बैठक होत आहे. या बैठकीत दरवाढी बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भाडेवाढ अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना लॉकडाऊन नंतर सामान्य स्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत आहे. त्यामुळे ही भाडेवाढीची मागणी होत आहे.

संबंधित पोस्ट

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

vishwatmaklokswamivarta

वारली चित्रकारांच्या रंगछटातून हवामान बदलासंबंधी जनजागृती…प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत वारली चित्रकलेने बोलू लागल्या शाळेच्या भिंती…

vishwatmaklokswamivarta

निवडणूक खर्च निरिक्षक बुलढाण्यात दाखल ; खर्चविषयक बाबींचा घेतला आढावा-> प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे> निरिक्षक दानिश अब्दुल्ला, नवनीत कुमार

vishwatmaklokswamivarta

महिलांचा देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्शठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा : डॉ. देवेश पाथ्रीकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध…

vishwatmaklokswamivarta