
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची हत्या, 5 जणांवर गुन्हा दाखल…
नवी दिल्ली प्रतिनिधी
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात गुरुवारी झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची पाच जणांनी भोसकून हत्या केली.
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात गुरुवारी झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची पाच जणांनी भोसकून हत्या केली.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. 11 ऑगस्ट रोजी मालवीय नगर पोलिसांना गेट क्रमांक 2जवळ एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, एक पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हाच जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. त्यानंतर, एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून मयंक पनवार या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळाली. मृताच्या मित्राने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत



