vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने-चांदी दर

गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने-चांदी दर..

व्यावसायिक प्रतिनिधी

सोने , चांदी (Gold- Silver)हे पाठिमागील अनेक दशकांपासून जगभरात महत्त्वाचा धातू ठरला आहे. पाठिमागील काही वर्षांत तर सोने दर (Gold- Silver Price Today) इतके चढे राहिले आहेत की, भारतातील बहुतांश लोकांनी त्यास गुंतवणुकीचे एक प्रमुख साधणच मानले आहे. हे दर दररोज बदलत असल्याे त्यावर नागरिकांचे बारीक लक्ष असते.

 

सोने , चांदी (Gold- Silver)हे पाठिमागील अनेक दशकांपासून जगभरात महत्त्वाचा धातू ठरला आहे. पाठिमागील काही वर्षांत तर सोने दर (Gold- Silver Price Today) इतके चढे राहिले आहेत की, भारतातील बहुतांश लोकांनी त्यास गुंतवणुकीचे एक प्रमुख साधणच मानले आहे. हे दर दररोज बदलत असल्याे त्यावर नागरिकांचे बारीक लक्ष असते. जाणून घ्या आज (21 ऑगस्ट) रोजी सोन, चांदी दर. हे दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे आहेत. देशाचा विचार करता भारतात आज प्रति 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,950 रुपये इतकी आहे. तर 100 ग्रॅम तो 4,79,500 रुपये इतकी आहे. त्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,310 रुपये इतकी आहे. तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 5,23,100 इतकी आहे. तर देशात आज चांदी प्रति किलो 55,600 रुपये दराने विकली जात आहे.

 

मुंबई

22 कॅरेट- 47,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,150 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- 55600.00 रुपये (प्रति किलो)

पुणे

22 कॅरेट- 47,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- 55600.00 रुपये (प्रति किलो)

नागपूर

22 कॅरेट- 47, 830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- 55600.00 रुपये (प्रति किलो)

नाशिक

22 कॅरेट- 47,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 52,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- 55600.00 रुपये (प्रति किलो)

(टीप- वरील सर्व दर गुड रिटर्न्स बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार)

वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.

संबंधित पोस्ट

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतील तरतूदीमध्ये सुधारणा

एक्साईड इंडस्ट्रीच्या कामगारांना कामावर परत घेण्याबाबत…व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घ्यावा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बबनसोडे

खामगाव आयटीआयमध्ये शुक्रवारी महिला रोजगार मेळावा