vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

28 ऑगस्टला मुंबई लोकलच्या केवळ हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

28 ऑगस्टला मुंबई लोकलच्या केवळ हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक…

 

मुंबई प्रतिनिधीहार्बर मार्गावर सीएसटीएम- चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मात्र मेगा ब्लॉक असेल.

मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल (Mumbai Local) मार्गावर देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर केला जातो. रविवार 28 ऑगस्ट दिवशी मुंबई लोकल वर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ब्लॉक नसणार आहे. केवळ हार्बर मार्गावर सीएसटीएम- चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मात्र मेगा ब्लॉक असेल. दरम्यान गणेशोत्सवापूर्वी 28 ऑगस्ट हा नागरिकांना खरेदी करण्यासाठी शेवटचा रविवार आहे.

 

दरम्यान हार्बर मार्गावर ठाणे- वाशी, नेरूळ अप-डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर 11.10 ते 4.10 या वेळेत ब्लॉक आहे. ठाण्यातून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलसाठी आणि वाशी, नेरुळ, पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या आहेत

 

ब्लॉक च्या काळात काही फेर्‍या रद्द केलेल्या असल्याने पनवेल- कुर्ला (प्लॅटफॉर्म 8) वर स्पेशल फेर्‍या चालवल्या जाणार आहेत. हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना मेन लाईन वर, वेस्टर्न लाईन वर 10-6 या वेळेत त्याच तिकीटावर प्रवासाची मुभा असणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर कोणतीही सेवा रद्द केलेली नाही

 

संबंधित पोस्ट

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गतपीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न..

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार ‘शौर्याचा शंखनाद’!*

vishwatmaklokswamivarta

मुंबईला डासांचा विळखा 25 हजारांहून अधिक नागरिकांना मलेरियाची बाधा !

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta