vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

*पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

 

मुंबई प्रतिनिधी ~ पाकपुरस्कृत आतंकवादाचा खातमा करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला असून त्यानुसार सिन्दुर ऑपरेशन द्वारे पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करून अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले.पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आता त्याच निर्धाराने पाकव्याप्त काश्मीर भारताने आपल्या ताब्यात घ्यावा.पाकव्याप्त काश्मीर मूळ भारताचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घ्यावाच असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दादर चैत्यभूमी ते इंदुमिल पर्यंत भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली.या यात्रेचे इंदुमिल येथे सभेत रुपांतर झाल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.भारत जिंदाबाद यात्रा काढून रिपब्लिकन पक्षाने आतंकवाद्यांविरुद्धच्या सिन्दुर ऑपरेशनचा भारताचा विजय साजरा केला. सिन्दुर च्या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी; भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे यावेळी अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.भारतीय सैन्याच्या शौर्याचा पराक्रमाचा आम्हाला अभिमान आहे.प्रधानमंत्री मोदींनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे जाहीर करून अत्यंत सूचक कल्पक पद्धतीने सिन्दुर ऑपरेशन नाव देऊन आतंकवाद्यांचा खातमा केला.आता पाकव्याप्त काश्मीर मधील सर्व आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी भारताने पाकव्यापत काश्मीर भारताच्या ताब्यात घेतलाच पाहिजे असे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना ; रामदास आठवले यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले; अभिनेत्री तृप्ती भोईर; रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड; जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे;रमेश गायकवाड; संजय पवार; गौरव शर्मा; श्रीकांत भालेराव; अमित तांबे; सचिनभाई मोहिते; रवी गायकवाड; अजित रणदिवे सोना कांबळे फुलाबाई सोनवणे अशा लांडगे अभया सोनवणे स्वप्नाली जाधव रत्ना शिंदे संजय खंडागळे राजाभाऊ गांगुर्डे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेत हजारो नागरिक तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘स्वप्ननिकेतन’ सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण; विविध विकास कामांचेही लोकार्पण

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल• ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

कठोर परिश्रम आणि कौशल्य हाच यशाचा खरा मंत्र – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी : पालकमंत्री संजय राठोड उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न, सामाजिक एकतेचा दिला संदेश